तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत वाकोडी शाळा अव्वल नंबर

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर तालुका पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा राघवेंद्र मंदिर बोल्हेगाव येथे नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये समूहगीत गायन स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोडी येथील शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.

नगर तालुक्यातील १६ केंद्रांमध्ये स्पर्धा होऊन प्रत्येक केंद्रामधील प्रथम क्रमांकाचा संघ यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सर्वच केंद्रामधील सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारचे समुहगीत गायन करुन सहभाग नोंदविला त्यामध्ये बाहेरील परीक्षकांनी निरपेक्ष पद्धतीने गुणदान करून वाकोडी येथील विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वर्ग से सुंदर देश हमारा या गीताला पहीला नंबर मिळाला.

या गीतामध्ये हिंदवी बरबडे,वंदन लुंकड,संस्कृती गवळी,पायल खांदवे, सौरभ गोरे,गौरी कराळे,आदिती लोखंडे,अनंत मोढवे,सोहम कराळे,जय गवळी,सुरज तोडमल,अभिषेक पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षिका नीलिमा कदम यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी प्रयत्न केले त्यांना उपक्रमशील शिक्षक नितीन पंडित व संजय पवार यांनी साथ दिली
मुख्याध्यापक बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल चालू आहे विद्यार्थ्यांचे यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, गटशिक्षणधिकारी पंचायत बाबुराव जाधव,विस्ताराधिकारी रवींद्र कापरे,निर्मला साठे,चंद्रकांत सोनार,रामनाथ कराड,केंद्रप्रमुक उदयकुमार सोनावळे,नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, सरपंच मंगलताई गवळी, उपसरपंच आदिनाथ मोढवे,सदस्य सुनिता बच्चू मोढवे,प्रतिक्षा विशाल गागरे,दीपिका मच्छिंद्र कराळे,अमोल तोडमल,शारदा पवार, शैनेश्वर पवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गवळी, सदस्य हौशाबापू गवळी,कल्याण गोरे व पालक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून शाळेचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाकोडी येथील पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विविध बक्षिसांचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here