सबलखेड मार्गाच्या कामाला मिळाला मुहूर्त, आष्टी ते साबलखेड रस्त्याचे काम सुरू

कड्यातील रस्त्यावर दुभाजक, कडी नदीवर दोन नवे पुल होणार

जामखेड /कडा प्रतिनिधी

नगर- जामखेड – बीड मार्गे कडा आणि आष्टी मार्गे प्रवास करणाऱ्या वाहन धारकांचे हाल आता थांबणार असुन नगर – जामखेड – बीड मार्गावरील जामखेड ते सौताडा मार्गाबरोबर आता आष्टी , कडा ते साबलखेड या कामाला मुहूर्त मिळाला आहे. आष्टी ते साबलखेड या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कडा येथील महेश मंदिर ते पेट्रोल पंप या दरम्यानच्या रस्त्यावर आता दुभाजक राहणार असुन कडा येथील कडी नदीवरील जुना पूल पाडून तेथे स्वतंत्र मार्गिका असलेले दोन पूल तयार केले जाणार आहेत.

नगरहून – जामखेड – बीडला जाताना किंवा बीडहून-जामखेड – नगरला जाताना सौताडा ते जामखेड , जामखेड ते चिंचपूर आणि आष्टी ते कडा या मार्गोवरून प्रवास करतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांची आदळआपट होत होती. सदरील मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येत आहे. अखेर केंद्र सरकारने अखेर आष्टी साबलखेड रस्त्याचे गाऱ्हाणे एैकले असुन या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

जामखेड सौताडा या रस्त्याचे काम सुरू झाल्यावर आता बहु प्रतिक्षित असलेल्या जामखेड ते चिंचपुर आणि आष्टी ते कडामार्गे साबलखेड या रस्ता कामाला नवीन वर्षात सुरुवात झाली आहे . टेंभुर्णी ( जि. सोलापूर ) येथील देशमुख कन्स्ट्रक्शन मार्फत साबलखेडच्या बाजूने हे काम सुरू झाले आहे. कडा येथील महेश मंदिर ते पेट्रोल पंप या दरम्यान रस्त्यावर आता दुभाजक असणार आहेत. कडा येथील कडी नदीवरील पूल पाडून त्या ठिकाणी स्वतंत्र मार्गिका असलेले दोन नवे पूल तयार केले जाणार आहेत.

या मार्गोमुळे कडा गावाचे रूपडे बदलेले जाणार आहे . रस्त्यावरील खड्डे बुजून तिथे सिमेंट रस्ता तर होणारच आहे . मात्र रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने प्रवास देखील सुखकर होणार आहे. कडा पेट्रोलपंप ते आष्टी दूध संघ आणि चिंचपूर ते जामखेड हा रस्ता दहा मीटर रुंदीचा असणार आहे . या रस्त्याच्या कामाचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने आधी नाली करून मग रस्ता कामास सुरुवात होणार आहे.
—————-
कोणता मार्ग किती किलो मिटर

नगर बीड अंतर १५० किमी ,
आष्टी ते साबलखेड मार्गाचे अंतर १७ किलो मिटर रूंदीकरण

१) साबलखेड -कडा येथील महेश मंदिर – १० मिटर रूंदीकरण

२) महेश मंदिर -कडी नदीवरील पूल अंतर – १२ मिटर रुंद

३) कडा नदीवरील पूल ते पेट्रोलपंप – 30 मीटर रुंदीकरण

४) कडा पेट्रोलपंप ते आष्टी दूध संघ – १० मीटर रुंदीकरण

४) चिंचपूर ते जामखेड अंतर – १० मिटर रूंदीकरण
————————————————
शंभर फुट रूंदीच्या हद्दीत रस्ता काम
कडा -आष्टी यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात असलेल्या शंभर फूट रुंदीच्या हद्दीत रस्ता काम करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त जर गरज भासली तरच नवीन जमीन संपादन बाबत राष्ट्रीय महामर्ग कडे मागणी केली जाईल अशी माहिती देशमुख कन्स्ट्रक्शन चे अभियंता अरविंद पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here