
शिष्यवृत्ती परीक्षेत लटकेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
जामखेड (प्रतिनिधी) जुलै 2022 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती (शिऊर) चे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यांच्या यशाचे सर्वच तालुक्यातुन कैतुक होत आहे.

जामखेड तालुक्यातील शिऊर जवळील ग्रामीण भागातील लटके वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दरवर्षी प्रमाणे आपल्या यशाचे शिखर गाठत यश मिळविले आहे. लटके वस्ती येथील मागे झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. या मध्ये चि. श्रीकांत राजेंद्र लटके याने 300 पैकी 276 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला. तसेच चि.उज्वल संतोष लगड याने 300 पैकी 270 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 9 वा क्रमांक, चि. विराज भागवत फाळके याने 300 पैकी 266 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 15 वा क्रमांक, कुमारी साक्षी भागवत निकम हिने याने 300 पैकी 266 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा क्रमांक, चि. प्रणव विश्वंभर उतेकर याने 300 पैकी 262 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 27 वा क्रमांक मिळविला आहे.

त्यांना वर्गशिक्षिका श्रीमती अनिता विठ्ठल पवार मॅडम व श्रीमती रसिका महालिंग गाढवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम (आण्णा) उतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर, केंद्रप्रमुख किसन वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लटके, उपाध्यक्ष रामचंद्र लटके शिक्षणप्रेमी नागरिक अमोल काळे ,राजेंद्र लटके, दादा लटके, सरपंच सौ गिरिजा उतेकर, उपसरपंच सौ प्रियंका तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री लटके, सौ उषा निकम, बदाम निंबाळकर व नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.







