सरपंच पदासाठी चिन्ह सांगितले खटारा, उमेदवारांने ऐकले खराटा अन्‌ केला प्रचार; मतदानाच्‍या दिवशी खराटा चिन्हच गायब…..

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही गंमती जंमती होत असतात. असाच प्रकार आमरावती मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायतीत झाला. मात्र या प्रकारामुळे सरपंच पदासाठी उभ्‍या असलेल्‍या उमेदवाराचे निकालापुर्वीच सरपंच होण्याचे स्‍वप्‍न भंगले आहे.


अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये मेळघाटातील एका सरपंच पदाच्या उमेदवाराला त्याचे बोधचिन्ह खटारा म्हणजे बैलबंडी सांगण्यात आले होते. मात्र उमेदवाराने खराटा ऐकून संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात त्याने आपला प्रचार खराटा या चिन्हाने केला. हा संपूर्ण प्रकार मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत निवडणुकीत घडला असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे असलेले चिंतामण चंदन बेठेकर यांच्या सोबत झाला.

मतदानाला गेले अन्‌ खराटाच गायब

मतदानाच्या दिवशी (EVM) इव्‍हीएम बॅलेटवर खराटा सोडून खटारा म्हणजे (बैलबंडी) दिसली आणि सरपंच पदाच्या उमेदवाराचा चर्चेत “ध चा म” झाला. ते जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना मशीनच्या बॅलेटवर आपले चिन्ह दिसले नसल्याने ते चकित झाले. यामुळे त्यांच्या सरपंच होण्याच्या स्वप्नाचा पूर्ण चुराडा झाला. मात्र त्यांनी आज तहसीलदाराकडे तक्रार करून निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here