

ट्रॅक्टरच्या धडकेत खांडवी येथील रयत सेवक बाबूराव भोसले यांचा अपघाती मृत्यू
जामखेड (प्रतिनिधी) तालुक्यातील जामखेड-करमाळा रोडवरील झिक्री गावाजवळ मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्या आपघात होऊन या आपघात खांडवी येथील रहाणारे रयत शिक्षण संस्थेत सेवक म्हणून नोकरी करीत आसलेले बाबुराव भोसले यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी या देखील गंभीर जखमी झालेल्या आहेत.

त्यांच्या पत्नीवर तातडीने जामखेड शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबू भोसले हे आपल्या खांडवी गावाहून जामखेडकडे येत असताना पुढे चाललेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर लक्षात न आल्याने बाबू भोसले यांच्या मोटारसायकलची सदर ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत बाबू भोसले त्यांचा मृतदेह जामखेड येथिल ग्रामीण रुग्णालयत अणला असून याच ठिकाणी त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. आपघातीची माहीती कळताच त्यांच्या मित्र परीवाराने जामखेड ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मयत बाबू भोसले हे खांडवी येथील रहिवासी तर अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर विद्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने व त्यांच्यासेवेचा मोठा कालावधी जामखेड तालुक्यातच गेल्याने अनेक लोकांशी त्यांचा जवळून परिचय होता. त्यांच्या मृत्यूमुळे खांडवी व आरणगावावर शोककळा पसरली आहे. रयत शिक्षण सेवक बाबुराव उत्तम भोसले यांचा अंत्यविधी आज दि. २० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता खांडवी ता. जामखेड येथे होणार आहे.

जामखेड तालुक्यातून ऊस वाहतुक
करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक ही विना
रिफलेक्टर सर्रास ऊस वाहतुक करत
आहेत. परीणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






