

घरकुल बांधकाम योजनेत जामखेड नगरपरिषद जिल्ह्यात प्रथम
जामखेड (प्रतिनिधी) जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांच्या अचुक प्रयत्नामुळे जामखेड नगरपरिषद घरकुल बांधून पूर्ण करण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांनी आपली घरकुलांची कामे सुरू करावीत. काही अडचण असल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

नुकताच जामखेड नगरपरिषद हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेच्या झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. एकुण ७४३ घरकूल मंजूर झाली आहेत. त्या पैकी ५३९ घरकुलांचे बांधकाम सुरू झालेले असुन ३२८ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहेत. तर १४६ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दुसर्या डीपीआर मध्ये मंजूर २०५ घरकुल मंजुर आहेत पहील्या डीपीआर मधील मंजूर घरकुलांसाठी अडीच लाखांपैकी २ लाख २० हजारांचे अनुदान नगरपरिषदला प्राप्त झालेले आहे. व दुसऱ्या डीपीआर मधील एकूण २०५ पैकी १८९ लाभार्थ्यासाठी प्रती घरकुल १ लाख याप्रमाणे अनुदान नगर परिषदेला प्राप्त झालेले आहे. यातील उर्वरित १६ लाभार्थ्यांना लवकरच अनुदान
प्राप्त होणार आहे. लाभार्थीच्या अडचणी समजून घेण्यासाठी व बांधकाम सुरू करण्यासाठी
नगरपरिषदे मध्ये प्रभागनिहाय महिन्यातून एक बैठक घेऊन लाभार्थीशी सतत संपर्क ठेवला
त्यामुळे लाभार्थ्याचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे मुख्याधिकारी
मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले आहे.

७४३ पैकी ५९९ घरकुलांना बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे. यापैकी ६० लाभार्थिनी बांधकाम परवाना घेतलेला असुनही अद्याप काम सुरू केले नाही त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करावे. उर्वरित १४४ लाभार्थिनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज देऊन बांधकाम परवानगी घ्यावी व लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करून पूर्ण करावे असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे. मुख्याधिकारी दंडवते यांच्या कामातील सकारात्मक वेगळेपण व पाठपुराव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नगरपरिषदला घरकुल बांधण्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याबाबत शहरवासियांमध्ये कौतुकाची चर्चा आहे.







