जामखेड तालुक्यातील शिऊर (फाळकेवाडी) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

जामखेड प्रतिनिधी

शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात. अशाच एका जामखेड तालुक्यातील शिऊर फाळकेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

विनोद शहाजी फाळके रा. शिऊर फाळकेवाडी आसे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाचे नाव आहे. विनोद हा गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात एस आर पी एफ मध्ये जिद्द आणि कष्टाच्या जोरावर भरती झाला होता. घरात कुठलाही शैक्षणिक अथवा राजकीय वारसा नसतानाही आपण मोठा अधिकारी व्हायचे व आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे असा निश्चय विनोद ने केला होता.

विनोद फाळके याचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी हे फाळकेवाडी या ठीकाणी झाले तर पाचवी ते सातवी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिऊर तर इयत्ता आठवी ते दहावी भैरवनाथ विद्यालय, शिऊर तर पुढील शिक्षण जामखेड येथिल ल. ना होशिंग विद्यालयात झाले होते .

पुढे पोलीस भरती झाल्यानंतरही विनोद याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली होती. आखेर २०२१ च्या झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल चार पाच दिवसांपुर्वीच लागला व या मध्ये तो उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला. विनोद याचे आईवडिल शेती करत आहेत तर त्यांचे मोठे बंधू सेवक फाळके हे पण शेती व ग्रामपंचायत सदस्य आहेत.

विनोद फाळके हा पोलीस उपनिरीक्षक झाला त्यामुळे त्याच्या यशाबद्दल शिऊर व फाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी त्याचा नुकताच शिऊर या ठीकाणी सन्मान केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गैतम (आण्णा) उतेकर, सरपंच हनुमंत उतेकर, बापुसाहेब माने, श्रीरामदादा कडु, भगवान समुद्र सर, रघुनाथ तनपुरे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिऊरकर, ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब पिंपरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here