पाणीपुरवठा योजनेसाठी कष्ट करून आ. रोहित पवार यांनी केली फाईल तयार, आन. आ. राम शिंदे यांनी आयती सही घेतली – रमेश (दादा) आजबे

पाठपुरावा केलेल्या सर्व कागदपत्रांचे पुरावे माझ्याकडे आहेत – रमेश (दादा) आजबे

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड शहराच्या पाणीपुरठा योजनेचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे. पाणी योजना आणण्यासाठी जे प्रयत्न आ. रोहित पवार यांनी केले होते त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत ते लागत आसतील तर भाजप कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे अवहान केले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी कष्ट करून आ. रोहित पवार यांनी फाईल तयार केली, आन. आ. राम शिंदे यांनी आयती सही घेतली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आ. राम शिंदे साहेब तुम्ही विकासाचे राजकारण करा मात्र विकासात खोडा घालण्याचे राजकारण करु नका असे म्हणत पाणीपुरवठा योजना ही फक्त आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळेच मंजुर झाली आहे असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश आजबे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे .

जामखेड शहरासाठी नुकतीच १७८.९० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांन मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र याचे श्रेय सध्या भाजप घेत असल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते रमेश आजबे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुढे पत्रकारांशी बोलताना आजबे यांनी सांगितले की जामखेड शहरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आसलेल्या पहील्या पाणीपुरवठा योजनेचा अरखडा हा फक्त जामखेड शहरापुरताच होता. आ. रोहित पवार यांनी या बाबत आजुबाजुच्या नागरिकांचा वाचार करत या लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी नगरपरिषद हद्दीतील इतर गावांचा या पाणी योजनेत समावेश केला. पुर्वी ही योजना ९५ कीलोमिटर ची होती. संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून आ. रोहित पवार यांनी या योजनेत वाढ करत ४७ कीमी पर्यंत वाढवली. २० ऑगस्ट २०२१ रोजी या योजनेला १३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. पुढे कोरोना काळ आल्याने १३८ कोटींचे टेंडर निघुनही कोरोना काळात स्टील व गजांचे रेट वाढल्याने सदर चे टेंडर परवडत नसल्याने कोणत्याच एजन्सीने भरले नाही. या नंतर पुन्हा १० फेब्रुवारी २०२२ रोजी १५१ कोटी रुपयांचे टेंडर निघाले मात्र यावेळीही युक्रेन च्या युध्दाचा परीणाम स्टील आणि गजांवर होऊन त्याचे रेट पुन्हा वाढले त्यामुळे काम पडवडत नसल्याने त्या वेळेस देखील सदर टेंडर कोणत्याही एजन्सी ने भरले नाही.

त्यामुळे मे महीन्यात आ. रोहित पवार यांनी पुन्हा १७९.९८ कोटींचा नीधी मंजुर व्हावा म्हणून मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फाईल पाठवण्यात आली. या मध्ये जामखेड नगरपरिषद हद्दीत ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत त्या ठिकाण च्या खाजगी व नगरपरिषदेच्या जागा वर्ग करण्यात आल्या. 

या मध्ये स्वतः  जागा मालक अनिल बाबर यांनी त्यांची लेन्हेवाडी हद्दीतील तीन गुंठे जागा या पाण्याच्या टाक्यांसाठी दिली आहे. तर बीड रोडसाठी विकासनगर, गोल्डन सीटी नगररोड, नगरपरिषद ओपन स्पेस, चुंबळी जंमदरवाडी व बटेवाडी साठी जमदारवाडी या ठीकाणी संयुक्त जागा देण्यात आली आहे, तर भुतवडा येथे नगरपरिषदेची स्वतःची जागा निश्चित करण्यात आली आहे, तर पाणी प्लांट नगरपरिषद नवीन कार्यालया शेजारी नाना नानी पार्क या ठीकाणी पाणी टाकी बसवण्यात येणार आहे. भुतवडा तलावातील पाणी चार महीन्यात संपले तर पुढे जनी चे पाणी पाईपलाईन द्वारे भुतवड येथील टाकीत सोडण्याचे नियोजन आहे. 

त्यामुळे पुढचे चार महिने भुतवडा तलावातील पाणी वापरण्यात येणार असुन उर्वरित आठ महिने या सात टाक्यांमध्ये सोडवण्यात येणारे उजनीचे पाणी या टाक्यांनद्वारे देण्यात येणार आहेत बाबत चे टाक्यांना जागा देण्यातचे सर्व कागदपत्रे रमेश आजबे यांच्या कडे आहेत.मागिल तीन दिवसांपासुन जामखेड नगर परिषदेच्या पाण्याचे श्रेय भाजप चे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. प्रा राम शिंदे सांगत आहेत की २०१९ साली त्यांनी तत्वता मान्यता घेतली होती मात्र त्या मान्यते मध्ये कुठली दिशा ठरवली नव्हती कुठली पाण्याची टाकी कुठे बसवायची हे ठरवले नव्हते फक्त एक कागद मुख्यमंत्री आले तेंव्हा पाईपलाईन मंजुर केली तो दाखवण्यात आला होता. कारण त्यांना माहीत होते की त्या वेळी आ. रोहित पवार यांचे विधानसभेचे पारडे जड असणार आहे. अनेक खात्यांचे मंत्री व पालकमंत्री असताना देखील आ. प्रा राम शिंदे यांनी जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले मात्र आ. रोहित पवार यांनी २०० टँकर कर्जत जामखेड मतदारसंघात सुरू केले होते. त्यामुळे पाण्याबाबत आ. राम शिंदे यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

नगरविकास खाते तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे होते आणि मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या कडेच आहे. आ. प्रा राम शिंदे यांनी पाणीपुरवठा योजना मंजुर करुन आणली तो कार्यकर्त्यांना घेऊन जो स्टंट केला तो साफ खोटा आहे. कारण आ. रोहित पवार हे कोरोना काळातही मतदारसंघातील विकास कामे आणण्यासाठी मंत्रालयातील उंबरठे झिजवत होते. शिंदे यांच्या काळात कृषी महाविद्यालय आले ते आम्ही मान्य करतो. मात्र पाणीपुरवठा व इतर विकास कामांचे श्रेय कोणी घेऊ नये या बाबत चे सर्व पुरावे कागदपत्रे माझ्या कडे आहेत. आ. रोहित पवार यांनी पाचशे कोटी रुपये आणले तर आ. प्रा राम शिंदे यांनी एक हजार कोटी रुपये अणावेत मात्र विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न करु नये आसे मत देखील रमेश आजबे यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here