जामखेड शहरात लावण्यात आलेले गुन्हेगारांचे बोर्ड हटवा – प्रा मधुकर (आबा) राळेभात

जामखेड शहरात सध्या शांतता असतानाही काही गुन्हेगारांचे बोर्ड शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात काही अनुचित प्रकार घडू शकतो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहरात व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने शहरातील लावण्यात आलेले बोर्ड हटवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे.

पाच वर्षापूर्वी बोर्ड बंदीबाबत जामखेड शहरात शांतता कमिटीच्या बैठकीत ठराव करण्यात आला होता. अनेक दिवस वाढदिवसाचे बोर्ड लागत नव्हते. परत आता बोर्ड लावण्यास सुरुवात झाली आहे. यातही गुन्हेगारांचे मोठ मोठे बोर्ड शहरात लागल्याने शहरातील व्यावसायिक व व्यापारी वर्ग दहशत व दडपणाखाली आहे. यामुळे प्रशासनाने ताबडतोब बोर्ड बंदीचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा. मधुकर राळेभात यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

एकेकाळी जामखेड शहर म्हणजे गुण्या गोंविदाने नांदणारे शहर म्हणून ओळखले जात होते. हिंदू लोक मुस्लिम सणात हिरिरीने सहभागी होत तसेच मुस्लिम लोकही हिंदू सणात सहभागी होत होते आनंदाने एकमेकांच्या सणा उत्साहात सहभागी होत. पण अलिकडच्या काळात शहराची संस्कृती बिघडत चालली आहे. व्यापारी वर्ग दडपणाखाली आहे. बोर्ड नसावेत असले तरी ते विकासाबाबत असावेत असे प्रा मधुकर राळेभात यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील सामान्य नागरिक म्हणून विनंती करतो की वाढदिवसाच्या नावाखाली गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांची, खूनातील आरोपी फरार आरोपी व इतर भागातील गुन्हेगार यांचे फोटो सहीत प्लेक्स जामखेड शहरात लावून शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

फ्लेक्स वरील अनेक लोक हे या शहराचे रहिवाशी नाहीत, परंतु त्यांना शहर दहशतीखाली ठेवायचे आहे. या साठी ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली सामूहिक गुन्हेगारी करणारी गैर कायदेशीर मंडळी जामखेड मध्ये स्वताचे व इतर गुन्हेगाराचे फ्लेक्स लावून शहरामध्ये दहशन निर्माण करत आहेत. प्रशासनाने हे सर्व फ्लेक्स काढून टाकावेत व पुन्हा परवानगी देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here