कुसडगांव येथिल राज्य राखीव पोलीस केंद्र आहे त्याच ठीकाणी रहावे, सरपंचांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

जामखेड प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्या नंतर शिवसेना शिंदे गट व भाजप चे सरकार आले आहे. सत्ता बदल होताच कुसडगाव येथिल राज्य राखीव पोलीस बल गटाचे केंद्र हे इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जामखेड तालुक्यावर मोठा अन्याय होत आहे. हे केंद्र जामखेड तालुक्यातील कुसडगाव तेथेच रहावे म्हणून तालुक्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने नुकतेच राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एस.एन. सय्यद यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एस.एन. सय्यद हे काल दि ३० डिसेंबर रोजी कुसडगाव येथिल राज्य राखीव पोलीस बल गट केंद्राच्या सुरू आसलेल्या कामांची पहाणी करण्यासाठी आले होते. यावेळी सरपंचांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या नेतृत्वाखाली गुरेवाडी – महारूळीचे सरपंच अंजली ढेपे , सावरगाव चे सरपंच काका चव्हाण, कुसडगावचे सरपंच शहाजी गाडे, घोडेगावचे सरपंच शरद जगताप, झिक्रीचे सरपंच दत्ता साळुंखे, पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, कुसडगावचे उपसरपंच नागेश कात्रजकर, याचबरोबर पोलीस निरीक्षक मधुकर मोर्का, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस नाईक शैलेश शिरसाठ, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उगले, शिंदे इंजिनिअर, पगार आर्किटेक्चर, सागर कोल्हे, वैभव कार्ले, सुनील कार्ले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक . एन. सय्यद यांनी सकारात्मकता दाखवून सांगितले की, सदर निवेदन शासनदरबारी मांडू असे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राखीव पोलीस बलाचे स्थलांतर न होता ते कुसडगाव ता. जामखेड जि. अहदमनगर येथेच व्हावे.सदर जामखेड तालुका हा दुष्काळी भाग असुन, सदर तालुक्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सदरचे केंद्र कुसडगाव येथेच व्हावे जेणे करुन जामखेड तालुक्यावर अन्याय होणार नाही.

तसेच सदर केंद्राचे काम जवळ जवळ जवळ ५० ते ७० टक्के झाले असुन त्यावरती शासनाने बराच खर्च देखील केलेला आहे. जर सदचे केंद्र इतरत्र गेले तर जामखेड तालुक्यातुन मोठा उठाव निर्माण हाईल. तरी हे टाळण्यासाठी सदरचे केंद्र जामखेड येथेच राहील यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here