जामखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची बदली करून कामांची चौकशी करा ?

जामखेड शहर भाजपा च्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची तडकाफडकी बदली करून नगरपरिषदेच्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी जामखेड शहर भाजपच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज तहसीलदार यांना आज दि ३० नोव्हेंबर रोजी दिले.

या वेळी शहर भाजप पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले की जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे जुन २०२० पासून जामखेड नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला आहे .ते मनमानी व एक अधिकार पद्धतीने कारभार करत आहेत. तसेच नागरीकांच्या कामासाठी देखील ते उपलब्ध नसतात असा आरोप केला आहे.

निवेदनात केलेल्या मागण्या मध्ये म्हंटले आहे की प्रशासक काळातील सर्व खर्चाची व अदा केलेल्या सर्व बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी, जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुक प्रक्रिया गुप्त असताना राजकीय दबावाखाली प्रभाग रचना व मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत, मागील दोन वर्षापासुन दैनंदिन व आठवडे बाजार व्यावसाय कर लीलाव प्रक्रिया झालेली नसून त्याची वसूली मात्र सक्तीने चालू आहे त्या मध्ये गैरव्यवार चालु आहे, जिओ कंपनीच्या शहरात विना परवाना बसवन्यात आलेल्या पोल मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, नगर परिषद अंतर्गत कामामध्ये व टेंडर पद्धती मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, जागेच्या व घरांच्या नोंदीमध्ये फेरफार करून आर्थिक गैरव्यवहार चालु आहे, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती प्रक्रिया मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, मोकाट वराह पकडण्याच्या निविदा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये जातीय तनाव निर्माण करण्याच काम केल आहे. तसेच आनाधिकृत बांधकामांना शास्ती कर न आकारता नोंदी लावल्या आहेत, कर्मचारी वर्गावर दबाव टाकुन चुकीचे कामे करून घेण्यात येतात, ज्या कर्मचाऱ्यांनी चुकेचे कामे केले
नाही त्यांना निलंबीत केले आहे, नागरिकांना भेटीसाठी वेळ देऊन भेटत नाहीत व व्यक्ती पाहून काम करतात, लॉकडाउन नियमांचा गैरफायदा घेत मुख्यअधिकारी यांनी कर्मचाऱ्यांन मार्फत व्यापाऱ्यांना जाणीव पूर्वक त्रास देऊन चुकीच्या पद्धतीने आर्थीक वसूली केली जात आहे,

डी.पी. प्लॅन (शहर विकास आराखडा) मध्ये सर्वेअर यांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, त्या मुळे जामखेड नगरपरिषदेचा डी.पी प्लॅन वदाच्या भोवर्‍यात सापडला आहे.
तरी वरील विषयाच्या अनुशंगाने मुख्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांची तडका – फडकी बदली करूनत्यांनी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.

निवेदन देता वेळी नगरसेवक बिभीषण धनवडे, अमित चिंतामणी, मनोज (काका) कुलकर्णी, तात्याराम पोकळे, गणेश आजबे, सोमनाथ राळेभात, मोहन (मामा) गडदे, ॲड. प्रविण सानप, गोरख धनवट, अर्जुन म्हेत्रे, संतोष गव्हाळे, उध्दव हुलगुंडे, नितिन धनवटे, ज्ञानेश्वर झेंडे, पोपट (नाना) राळेभात, गैतम उतेकर, सुनिल यादव, बापु माने, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ अल्ताफ शेख, प्रविण होळकर, डॉ. नितीन अनभुले, प्रकाश राऊत, सह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here