लहुजी वस्ताद जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतीविधी तर्फे जोर काढणे स्पर्धा उत्साहात संपन्न.

अहमदनगर प्रतिनिधी

लहुजी वस्ताद जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतीविधी तर्फे अहमदनगर येथे जोर काढणे स्पर्धा उत्साहात संपन्न. या स्पर्धेसाठी एकसे बढकर एक अशा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

सिद्धार्थ नगर येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याजवळ नुकतीच एकूण दोन वयोगटांमध्ये ही स्पर्धा पार पडली 16 ते 21 वयोगटातील विजेते प्रथम क्रमांक संदीप कोकाटे 455 जोर, द्वितीय क्रमांक कुणाल खंडेलवाल 376 जोड, तृतीय क्रमांक रवींद्र आंधळे 110 जोर यांनी मिळविला आहे. वय वर्ष 22 ते 30 दुसरा गट विजेते
प्रथम क्रमांक मयूर वाकचौरे 318 जोर, द्वितीय क्रमांक शाहरुख शेख 248 जोर तर तृतीय क्रमांक अजय ठोकळ 150 जोर यांनी मिळविला आहे. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा आणी रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.

अशा या एका अर्थाने महाराष्ट्रात स्तरावर झालेली आगळीवेगळी स्पर्धा हे आजच्या लहुजी वस्ताद जयंतीचे एक वैशिष्ट्य ठरले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समरसता गतीविधी संयोजक प्रशांत सहस्रबुद्धे. शहर संयोजक चंद्रकांत काळोखे, समरसता जिल्हा मंडळ सदस्य सुरेंद्र बोराडे. सुरज शिंदे. उमेश झेंडे. गुलाबराव गाडे, चंद्रकांत. खजिनदार ,सागर गायकवाड स्पर्धेचे पंच म्हणून बलसागर जिमचे संचालक सागर सुरपुरे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडले.

स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण झाले. यावेळेस सीए सी प्रसाद पुराणिक यांनी सर्वांना लहुजींची प्रतिमा भेट म्हणून दिली व जिल्हा संघचालक माननीय डॉक्टर रवींद्र साताळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच रामवाडी व सिद्धार्थ नगर भागातील जुन्या कुस्तीगरांचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा कार्यवाह श्री वाल्मीक कुलकर्णी, शहर कार्यवाह श्री हिरकांजी रामदासी, महेंद्र भाई, अजय गांधी निलेश लोढा हे उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी सरळ हाताने आर्थिक मदत करणारे व इतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो.. अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो.. छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय.. महामानव श्री. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.. भारत माता की जय.. वंदे मातरम.. अशा तरूणांनी दिलेल्या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here