कांदा विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या पिकअपचा टायर फुटला, कर्जत तालुक्यातील तिघांचा मृत्यू

कर्जत प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातुन सोलापूर येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या पिकअपचा टायर फुटून झालेल्या अपघातात कर्जत तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांसह चालक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. या बाबत कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी हे सोलापूरकडे कांदा विकण्यासाठी घेऊन जात असताना बुधवारी पहाटे पिकप गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात होऊन यामध्ये दत्तू भानुदास शेळके, वय ५५, श्रीमलसिंग धोंडीसिंग परदेशी, वय: ४८ नितीन बजंगे वय 30 वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोरेगाव परिसरामध्ये शोक काळा पसरले आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सोलापूर जिल्हाच्या ठिकाणी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी सोलापुरला कांदा विकायला जात असताना पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ जवळ अचानक पिकअप गाडीच्या डाव्या बाजूच्या दोन्हीही टायर फुटले आणि गाडीने पलटी झाली आणि या मध्ये दोन शेतकऱ्यांसह वाहन चालकाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर या गाडीमधील सर्व कांदा रस्त्यावर पडला होता. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून सायंकाळी कोरेगाव येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here