सदिच्छा व आघाडीच्या झांजावतामुळे आमचा विजय रथ कोणीही रोखू शकत नाही – संतोष भोंडवे सर

जामखेड प्रतिनिधी

शिक्षक बँकेच्या निवडणूक प्रचारात सदिच्छा बहुजन मंडळ साजिर व शिक्षक संघ आघाडीने जिल्ह्यात जोरदार आघाडी घेतली असून प्रचारात झंझावात निर्माण केला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत सदिच्छा मंडळ व आघाडीचा विजय रथ कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन श्री.संतोष भोंडवे सर यांनी तालुका प्रचार दौर्यादरम्यान बोलताना सांगितले.

सदिच्छा मंडळ, बहुजन,शिक्षक संघ (थोरात गट), साजीर महिला आघाडी चे सर्व निष्ठावंत कार्येकर्ते तनमनधनाने आघाडीच्या विजयासाठी प्रयल करत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा आढावा घेतला असता प्रत्येक तालुक्यात मताधिक्य मिळेल असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

गुरुमाऊली 1 व 2 ही 2 मंडळे फक्त नावाला असून, स्वार्थासाठी, पैशासाठी म्हणजेच भ्रष्टाचार करण्यासाठी हे एकत्र येत होती & आहेत. पुढील बाबींचा विचार सर्व सभासदांनी केला तर गुरूमाऊली च्या नेत्यांना व उमेदवारांना मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. असे प्रतिपादन सदिच्छा महिला आघाडी च्या अध्यक्षा श्रीम. कामिनी राजगुरु मॅडम यांनी आजच्या प्रचार दौऱ्यात सांगितले.

शिक्षक बँकेत सोयरे धायरे चे राजकारण जोरात चालते. गुरूमाऊली मंडळ सत्तेत आले की, निलंबित कर्मचारी ठुबे यांना थेट पदोनतीने बँकेत सेवेत घेतले. बँक शताब्दीसाठी १ कोटी रुपयाची उधळपट्टी केली. त्या मध्ये सभासदांचे हित शून्य होते. तर नेते & संचालक यांचे मात्र मोठे हित त्यामध्ये सामावले होते.

राहुरी शाखेतील रक्कम एसटीने जात असताना गहाळ झाली तिचा अजुन तपास नाही. संचालकांचा कोरोना प्रवास भत्यावर तब्बल 60 लाखांचा डल्ला. कोरोणा कालावधीत पूर्ण निर्बंध असताना या 21 संचालकांनी नेमका कुठून & कसा प्रवास केला.हे न उलगडणारे कोडे आहे. पोरबंदर चा देखील घड्याळ घोटाळा केला. या बाबींमुळे सभासदांमध्ये तीव्र संताप असल्याचे शाळांशाळा मधील प्रचारात दिसून येत आहे.

त्यामुळे येत्या 16 ऑक्टोबर ला कपबशीला मतदान करून , नातेगोत्यांचे मंडळ चालवणारे, संचालकांना पुन्हा दोनदा तिकीटे देवून निवडणूक लढवायला सांगणारी मंडळे भ्रष्टाचाराला प्रचंड आसुसलेली व चटावलेली आहेत. त्यामुळे दोन्ही गुरुमाऊली एकच नाण्याच्या दोन बाजु असून, त्यांच्या भुल भुलैय्याला न भुलता – बँकेच्या व विकास मंडळाच्या पारदर्शी कारभारासाठी सत्ता आमच्या ताब्यात द्या.

यांच्या एकाधिकार शाहीला सभासद पूर्णवैतागलेअसून,त्यामुळे यां दोन्ही गुरु माउलींना हुसकावण्याची नामी संधी येत्या रविवारी आली आहे. त्यामुळे अभी नही तो कभी नही या न्यायाने चला यां बंडोबांना आता कायमचे थंड करून बँकेच्या सत्तेतून हद्दपार करू या असे आवाहन सर्व सदिच्छा,IBTA, शिक्षक संघ व साजीर महिला मंडळ आघाडी प्रेमी शिक्षक बंधु भगिनी यांनी केले आहे.

या वेळी तालुका प्रचार दौरा व गृह भेटी दरम्यान सदिच्छा मंडळ व आघाडीचे मार्गदर्शक ,सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री.नारायण राऊत सर, दोन्ही उमेदवार श्री.मल्हारी पारखे सर, श्री.अशोक राऊत सर, जिल्हा सरचिटणीस श्रीम.अर्चना भोसले मॅडम, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. संतोष हापटे सर ,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब मोरे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष श्री.भोंडवे सर, जालिंदर राउत सर ,केशवराज कोल्हे सर, ज्ञानेश्र्वर कोळेकर सर, राजगुरू मॅडम, गडकर मॅडम, कचरे सर, घोलप सर, किरण गोरे सर, अविनाश नवसरे , अमोल पवार , मनोजकुमार कांबळे ,राजेश्वर पवार, नितीन जाधव, सिताराम निगुडे, मारुती गीते, उपेंद्र आढाव, संजय आरेकर सर, धुळाजी देवकाते सर, नेमाडे सर, दळवी मॅडम, घोलप मॅडम, कचरे मॅडम , काकासाहेब कुमटकर, निलेश बोराडे, गणेश देवकाते, संभाजी जाधव ,रमेश दराडे व इतर सदिच्छा व आघाडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here