धक्कादायक…. भाजपच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, बीड हादरलं….

बीड : बीडमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे.भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.


बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री आपल्या कुटूंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झाेपले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्या मागचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगणयात आले.


या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here