संघटना हे त्यागाचे पद- श्री.डॉ. संजय कळमकर

जामखेड प्रतिनिधी

शिक्षक बँक निवडणुकीची धामधुम चालू असताना जामखेड तालुक्यातील प्रचाराच्या निमित्ताने आलेले शिक्षकांचे आदरस्थान डॉ. श्री संजयजी कळमकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की संघटनेचे पद हे त्यागाचे प्रतिक आहे.

गुरुकुल- स्वराज्य युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीम. शिल्पा साखरे/ घोडेस्वार, आणि विकास मंडळाचे उमेदवार श्री. अनिल अष्टेकर तसेच कर्जतचे उमेदवार श्री. विनोद देशमुख यांच्या प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. सोबत जिल्हा संघटक श्री. विजय महामुनी व जिल्हा नेते दत्ता चोथे उपस्थित होते.

तुमचा त्याग हाच भविष्यातील तुमच्या संघटना आणि मंडळाच्या कामाची पावती देतो. कामाने मोठे व्हा व काम करीत रहा एक दिवस फळ मिळाल्या शिवाय राहणार नाही.
इतर मंडळांचे नेते हे बँकेचे भोगाचे पद मिळवण्यात धन्यता मानताना दिसताहेत.

तरुणांच नेतृत्व उदयास आल्यामुळे गुरुकुल स्वराज्याची युती होऊन गुरुकुल स्वराज्य मंडळ शिक्षक बँकेवर विजयी पताका फडकवल्या शिवाय राहणार नाही. असा ठाम विश्वास जेष्ठ साहित्यीक आणि शिक्षकांच्या प्रश्नांना ज्यांचा खऱ्या अर्थाने परीस स्पर्श झालेला आहे असे शिक्षकांचे श्रद्धा स्थान डॉ. संजयजी कळमकर सरांविषयी बोलताना समितीचे माजी अध्यक्ष श्री .विजयकुमार जाधव यांनी मत व्यक्त केले.

या दरम्यान उत्तम पवार, मंडळाचे अधक्ष राम ढवळे, संभाजी तुपेरे, संजय घोडके, दत्ता उदारे, जितेंद्र आढाव, दत्ता भोसले, कांतीलाल बरडे, अंकुश ओमासे, प्रताप पवार, अशोक घोडेस्वार, सुशील पौळ, रजनीकांत साखरे, पोपट तुपसौंदर, अजित गोरड, विजय जेधे, किशोर राठोड, जालिंदर यादव, स्वप्निल सवाई, राजेंद्र साठे, नवनाथ बहीर, राजेंद्र कदम, अशोक जाधव, सुभाष लवांडे, राजू जरे योगेश तुपविहीरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here