जोरदार पावसामुळे जामखेड शहरातील विंचरणा नदीला आला पुर

जामखेड प्रतिनिधी

सौताडा परीसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहरातुन जाणार्‍या विंचरणा नदीला मोठा पुर आला आहे. या पुरामुळे जामखेड नगर रोडवरील विंचरणा नदीच्या खालच्या (जुन्या) पुलावरून पाणी वहात आहे. दोन वर्षांनी व या वर्षी च्या पहील्याच पावसाने प्रथमच नदीला पूर अल्याने पुर पहाण्यासाठी पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बीड जिल्ह्यातील उगम पावणारी विंचरणा नदी ही पुढे सौताडा या ठीकाणाहुन जामखेड च्या दिशेने वहात आहे. या वर्षी बीड जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आसल्याने सौताडा येथील वरच्या बाजूला असलेला भुरेवाडी तलाव व जामखेड येथिल भुतवडा तलाव ओसंडून वहात आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सौताडा परीसरात जोरदार पाऊस पडत असल्याने विंचरणा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. याच जोरदार पावसामुळे या विंचरणा नदीला मोठा पुर आला आहे. तसेच ही नदी जामखेड शहरातुन जात आहे. त्यामुळे जामखेड नगर रोडवरील आसलेल्या विंचरणा नदीवरील खालच्या (जुन्या) पुलावरून पाणी वहात आहे. त्यामुळे हे पाणी पुलावरून खाली पडत असताना नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आसल्याने मागिल काही दिवसांपुर्वीच तालुक्यातील सर्व तलाव ओसंडून वाहत आहेत. काल रात्री पासून पुन्हा जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने आनखी काही दिवस अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here