बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी
शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या कु. साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय १८) या विद्यार्थीनीने राहत्या घरात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ती एकुलती एक होती.
संताजीनगर येथे बाबासाहेब भालसिंग यांचा आरो पाण्याचा प्लॅन्ट आहे. साक्षी ही इयत्ता बारावी मध्ये नगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पण सध्या वसतीगृह बंद असल्याने ती घरीच आॅनलाईन अभ्यास करत होती. सकाळी साडेनऊ वाजता राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. पुढील तपास पोलिस पो. हे. कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करीत आहेत.