जामखेड प्रतिनिधी

विस्ताराने मोठे असलेल्या जामखेड शहरात भारतीय स्टेट बँक यांनी सर्वसामान्य लोकांच्या व शेतकऱ्यांच्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी चालु केलेल्या ग्राहक सेवा केंद्र नक्कीच जनतेच्या फायद्याचे ठरले असे प्रतिपादन कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांनी केले
शहरातील कोर्ट रोडवरील पत्रकार ओंकार दळवी व अक्षय ठाकरे यांच्या आॅनलाईन. काॅम व एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंचायत समिती सभापती सुर्यकांत मोरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकरराव राळेभात. नगरसेवक महेश निमोणकर. मोहन पवार.दिंगबर चव्हाण सुंदरदास बिरंगळ. सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले. पत्रकार वसंत सानप सुदाम वराट. लियाकतभाई शेेख प्रकाश खंडागळे पप्पुभाई सय्यद अजय अवसरे एसबीआय चे आकाश छबिले अदिसह पत्रकार नागरिक उपस्थित होते
यावेळी भारतीय स्टेट बँकचे आकाश छबिले यांनी ग्राहक सेवा केंद्रात मिळणाऱ्या सेवा सुविधा आधार बॅक पेमेंट. पैसे पाठवणे, पासबुक प्रिंटींग करणे, कर्जाचे हप्ते भरणे, सर्व विमा योजना बीलभरणा, पैसे हस्तांतरण, आधारची कामे, सातबारा उतारा ऑनलाईनव्दारे मिळणार्‍या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत आभार पत्रकार ओंकार दळवी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here