जामखेड प्रतिनिधी

हळगाव येथे शेतातील सामाईक बांधावर टाकलेल्या काट्या काढण्यास सांगितल्या वरुन काठी व दगडाने झालेल्या भांडणात एक जण जखमी झाला आसुन एकुण महीलेसह तीन जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी व तीचे पती आपल्या हळगाव येथील शेतात काम करीत होते. या वेळी त्या ठीकाणी आरोपी मधुकर दगडू लांडे, संतोष मधुकर लांडे व सौ. मालन मधुकर लांडे रा. हळगाव ता. जामखेड हे त्या ठिकाणी आले. यावेळी फीर्यादी चे पती आरोपींना समजावून सांगत होते की तुम्ही समाईक बांधावर टाकलेल्या काट्या काढुन घ्या. याचा राग आरोपींना आल्याने आरोपी नंबर एक याने हतात दगड घेऊन फीर्यादी च्या पतीला मारुन जखमी केले. तसेच आरोपी नंबर दोन याने हातातील काठीने जबर मारहाण केली. तर आरोपी नंबर तीन हीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फीर्यादी चे पती उपचार घेत आसल्याने त्यांनी उशीर फीर्याद दिली आहे. घटनेतील फिर्यादी चे पती व आरोपी हे भाऊ भाऊ आहेत. या प्रकरणी फिर्यादी सौ चंद्रभागा लक्ष्मण लांडे रा.हाळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महीलेसह वरील तीन जणांना विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सा.फौ .विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here