कुपोषित बालकांनकांसाठी जामखेड येथे झाला असाही एक पोषण तुला, ३५० किलो पोषण आहार झाला जमा

जामखेड प्रतिनिधी

पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढु नये याच अनुशंगाने जामखेड तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्या मुलांच्या वजनाइतका मोफत पोषक आहार दिला. या अहाराचे तालुक्यातील कुपोषित बालकांना वाटप होणार आहे. या वेळी अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन संपन्न झाले. कुपोषित बालकांनकांसाठी जामखेड येथे झालेल्या आगळ्या वेगळ्या पोषण तुला चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या वेळी ३५० किलो पोषण आहार जमा झाला.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे .यामध्ये ३० सप्टेंबर रोजी पोषण महिन्याचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व एचबी तपासणी करण्यात आली .तब्बल १२५ मुलींची तपासणी या दिवशी करण्यात आली .तसेच प्रत्येक अंगणवाडीमध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धा घेण्यात आली होती .त्यामधील तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला .तालुक्यातील कुपोषित मुलांच्या आहारासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी यासाठी पोषण तुला कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये पंचायत समिती अधिकारी ,कर्मचारी सर्व विभागाचे अधिकारी ,कर्मचारी तसेच इच्छुक व दानशूर पालक यांनी आपल्या मुलांची पोषण तुला करून तेवढ्या प्रमाणात पौष्टिक आहार अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी दान केला. यामध्ये एकूण ७० किलो शेंगदाणे ७० किलो गूळ ५० किलो सफरचंद ७० डझन केळी, आठ किलो फुटाणे ,पाच किलो डाळी ,विविध कडधान्य ,काजू ,बदाम, खजूर ,राजगिरा लाडू ,भरडा असे विविध पदार्थ लोकसभागातून प्राप्त झाले .सदर पदार्थ सॅम श्रेणीतील कुपोषित बालकांना दररोज अंगणवाडी केंद्रात खाऊ घालून त्यांची वजन वाढ होऊन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी मान श्री अजित थोरबोले ,प्रांताधिकारी कर्जत जामखेड मान श्री योगेश चंद्रे तहसीलदार जामखेड ,श्री प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड ,श्री राजेंद्र सुपेकर ,कृषी अधिकारी जामखेड ,श्रीमती ज्योती बेल्हेकर ,बालविकास प्रकल्प अधिकारी जामखेड ,श्री डॉक्टर बोराडे तालुका आरोग्य अधिकारी, श्री खैरे गटशिक्षणाधिकारी ,श्री दयानंद पवार ,सहाय्यक गटविकास अधिकारी ,श्री अशोक शेळके कृषी अधिकारी पंचायत समिती जामखेड तसेच ल.ना. होशिंग महाविद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांत सर व सर्व अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका ,पालक किशोरवयीन मुली व छोटी बालके उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here