धक्कादायक !बंदोबस्तावरील पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या

राहुरी प्रतिनिधी दि १ अॉक्टोबर

राहुरी मुळा धरणाच्या मुख्य गेटवर ऑनड्युटी कार्यरत असलेले पोलीस हेडकोन्स्टेबल भाऊसाहेब दगडु आघाव (वय ५२ वर्षे,राहनार बारागांव नांदुर) यांनी आज सकाळी आपल्या कडे असलेल्या सरकारी रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महहत्या केल्याचे पुढे येत आहे. मात्र त्यांनी आत्महहत्या का केली याबद्दल राहुरी पोलीस तपास करत आहेत.

हेडकोन्स्टेबल आघाव पोलीस खात्यात सेवेत होते. त्यांची नेमणूक जिल्हा मुख्यालय अहमदनगर येथे असून सध्या ते मुळाधरणाच्या सुरक्षेसाठी धरणाच्या मुख्य चौकीवर बंदोबस्तास असताना आज(शनिवारी)सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान स्वःताचे सर्विस रायफल मधुन गोळी मारून घेऊन अत्महत्या केली.

घटनेची खबर येताच जिल्हा पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भाऊसाहेब आघाव यांनी चौकीच्या दाराला आतुन कडी लावून अत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याची माहिती आहे. राहुरी पोलीसांनी पंचा समक्ष चौकीचे दार लाथा मारून तोडून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणी साठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे.

घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने भेट देत माहिती घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नव्हते. राहुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here