कडा प्रतिनिधी
नगर जामखेड रस्त्यावरील कडा येथुन शेरी कडे जात असताना वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने या गाडीने दोन तीन पल्ट्या खाल्या या मध्ये झालेल्या अपघातात शेरीचे रहिवासी असलेले तलाठी पोपट गोरे यांचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी रात्री नऊ च्या सुमारास घडली.
पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत असलेले तलाठी पोपट गोरे हे कामानिमित्त कडा येथे आले होते. त्या नंतर उशिरा आपल्या चारचाकी वाहनातून क्रमांक MH 16 BH 5758 या मधून जात असताना नगर जामखेड रस्त्यावरील शेरी जवळील महावितरण कार्यालयाच्या अलीकडे काही मीटर अंतरावरील वळणावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने दोन ते तीन पल्ट्या खाल्या त्यांना अपघात जबर मार लागल्याने त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.






