साहेब, झवेरी बाजारातल्या खाऊ गल्लीत पण बॉम्ब ठेवलाय ; नान्नज येथे आफवा पसरवणाऱ्या आरोपीचा दुसरा करारनामा उघड
जामखेड प्रतिनिधी, दि २० सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील नान्नज या ठीकाणी बॉम्ब ची आफवा पसरवणाऱ्या आरोपीने पुन्हा दुसर्या दिवशी मंबई येथील झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची आफवा पसरल्याने पुन्हा मंबई पोलीसांची धावपळ उडाली होती. हा त्याचा दुसरा करारनामा उघड झाल्याने त्यास मंबई पोलीसांनी बेड्या ठोकल्या आसल्याचे कारण समोर आले आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज या ठीकाणी आरोपी दि १८ रोजी आरोपी दिनेश सुतार याने नान्नज या ठीकाणी सहा बॉम्ब ठेवले आहेत आशी माहिती मुख्य नियंत्रण कक्ष मंबई यांना दिली होती जामखेड पोलीसांनी घटनास्थळी शोध घेतला असता सदर घटना ही आफवा आसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आसता सदर आरोपी सोलापुर जिल्ह्यातील आसल्याचे समजले मात्र तो सारखा फोनवरून पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा मंबई येथील झवेरी बाजारातील खाऊ गल्ली परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असून, मोठा घातपात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होणार आहे, असा कॉल दुसर्या दिवशी म्हणजे सोमवार दि १९ रोजी पोलीस नियंत्रण कक्षात थडकला आणि क्षणार्धात पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तत्काळ संबंधित परिसर रिकामा केला. सर्व परिसराची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत काहीच आढळले नाही. अखेरीस कोणीतरी जाणूनबुजून खोटा कॉल केल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे एकाला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याचे नाव दिनेश सुतार (२४) असे असून घरच्यांशी भांडण झाल्याचा राग मनात ठेवून त्याने हा खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नान्नज येथे अफवा पसरवणाऱ्या आरोपीचा हा दुसरा करारनामा उघड झाला आहे.
या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंबई पोलीसांनी त्याच्या मोबाइल लोकेशनवरून भुलेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आपले नाव दिनेश सुतार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. झवेरी बाजारात कोणताही बॉम्ब ठेवला नसल्याचे दिनेशने स्पष्ट केले. अखेरीस त्याला अटक करण्यात आली. पोलीस सुतारची कसून चौकशी करत आहेत.
बेराेजगार तरुण अन्…
मूळचा सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चोपडी गावचा सुतार बेरोजगार आहे. गावी घरच्यांशी भांडण झाल्याने तो सांगलीवरून ८ ते १० दिवसांपूर्वी मुंबईत आला. पूर्वी काम करणाऱ्या काळबादेवी येथील शकुंतला बिल्डिंगजवळील एका दुकानाबाहेर राहत असल्याचे दिनेशने सांगितले.
त्या महिलेचा होता राग
फेसबुकद्वारे ओळख झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील महिलेने त्रास दिल्याने दिनेशने झवेरी बाजारच्या काॅलपूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह जामखेड पोलिसांनाही कॉल करून जामखेड तालुक्यातील नान्नज या परिसरात बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरविली होती, असेही पोलीसांच्या चौकशीत आढळून आले आहे.