जामखेड पोलीसांकडून चोरी गेलेली मोटार हस्तगत, दोघांना अटक; भुम पोलीस स्टेशन येथून आरोपी ताब्यात 

जामखेड प्रतिनिधी १९ सप्टेंबर

जामखेड तालुक्यातील महारूळी येथून चोरी गेलेली मोटार हस्तगत करून चोरट्यांना भुम पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील महारूळी येथील शेतकरी अशोक दत्तु यवले यांच्या महारुळी शिवारतील शेती गट नं. १११ मधील विहीरीवरून दि. १७ सप्टेंबर सायंकाळी ६ ते १८ सप्टेंबर सकाळी १० वाजताचे दरम्यान रोजी कोणातरी आज्ञात चोरट्याने इलेक्ट्रीक मोटार चोरून नेली होती. या बाबतची फिर्याद शेतकरी अशोक दत्तु यवले यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार तपास करत असताना जामखेड पोलीसांना काशिनाथ भानुदास ढेपे व धनंजय भारत थोरात महारोळी यांनी ही मोटार चोरी केली असून ते फरार असल्याचे समजले.


दरम्यान जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक अजय साठे व पोलीस काॅन्स्टेबल नवनाथ शेकडे यांना सदर आरोपींबाबत माहीती मिळाली की सदर आरोपी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरूड येथे पकडण्यात आले आहेत. यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस नाईक अजय साठे व पोलीस काॅन्स्टेबल नवनाथ शेकडे यांना व होमगार्ड राहुल भिसे यांना पाठवले आसता सदर कर्मचारी यांनी व चोरीस गेलेल्या मोटारीसह दोन आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनला आणले. सदर आरोपींस अटक करण्यात आलेली आहे. सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here