शेवगाव (प्रतिनिधी ) शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरबाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रभाग क्रमांक १२ मधील मिल्लतनगर फातेमा मस्जिद परिसरातील पार पडलेल्या मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचा ० ते ५ वयोगटातील बालकासह सर्व वयोगटातील सुमारे २०० नागरिकांनी लाभ घेतला. मौलाना आबेद हाफिज साहब यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या काळात शासनाच्या विविध सोयीसवलतीच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असून आधार कार्ड ही मनुष्याची खरी ओळख आहे. त्यामुळे मनुष्याचे आधार कार्ड त्यांच्या बँक खाते, पेन कार्ड, मतदान कार्ड आदींसह विविध ठिकाणी प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबत अडचणीची परिस्थिती तयार होत असल्याने आधार कार्ड प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असल्याचे प्रतिपादन मौलाना आबेद हाफिज साहब यांनी यावेळी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत मान्यवर बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, युवा नेते अजिंक्य लांडे, हाजी फिरोज पठाण, हाजी शफिक शेख , आय्युब पठाण, रिजवान शेख, जमीर पठाण, इरफान पठाण, वसीम मुजावर, इस्माईल शेख आदींसह परिसरातील जेष्ठ व युवा कार्यकर्ते महिला भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधार कार्ड नोंदण्यासाठी पहिल्या दिवशी मोठी गर्दी उसळल्याने दुसऱ्या दिवशी ही हा उपक्रम सुरु ठेवण्यात आला होता. आरबाज शेख यांच्य्यासह जमीर शेख, ख्वाजा शेख, जहाजी शेख, एजाज शेख, संकेत फडके, हबीब शेख, अनिस शेख, अकिब मुजावर, दानीश इनामदार, सोहेल सय्यद आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here