पुणे बॉस्केटबॉल चे सचिव मा. प्रा. सचिन सर गायवळ यांच्या नेतृत्वात तयार झालेला संघ विजयी
सांगोला : प्रा. सचिन सर गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील कुमार 18 मुलींच्या संघाने सांगोला येथील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद खेचून आणले.
याबाबत माहिती अशी की सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै. बापूसाहेब झपके यांच्या 41 व्या स्मृतीपित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल असोसिएशन व सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार 18 वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत नागपूरच्या संघाला पराजित करीत विजयश्री खेचून आणून राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे तर कुमार 18 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघाला मुंबई संघाकडून पराजित होऊन पुणे संघाला उपविजेतेपद उपविजेेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या यशाबद्दल प्रा. सचिन सर गायवळ व विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा. सचिन सर गायवळ हे जामखेड तालुक्यातील सोनेगावचे सुपुत्र असून ते पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव म्हणून काम करीत आहेत, गेली अनेक वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील संघाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षिसे जिंकून आणली आहेत. खेळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले असून, या बास्केटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून 18 वर्षाखालील मुली व मुलांच्या संघाचे समाजातील सर्व थरातून कौतुक केले जात आहे.