बापरे! नान्नज मध्ये सहा बॉम्ब ठेवले आसल्याचा फोन आला आणि…. पुढे काय घडले सविस्तर वाचा

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज या ठीकाणी सहा बॉम्ब ठेवले आहेत. त्यास एका मेडिकल वाल्याने मदत केली आहे. असा एक फोन मुख्य नियंत्रण कक्ष मंबई यांना गेला. आणि पोलीसांची एकच धावपळ उडाली. आखेर एका व्यक्तीने ही आफवा पसरवली आसल्याचे पोलीसांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.


या प्रकरणी दिनेश सुतार (पत्ता माहीत नाही) या व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नान्नज तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. या गावामध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत व त्यास नान्नज येथिल एका मेडिकल वाल्याने मदत केली आहे असा एक फोन मुख्य नियंत्रण कक्ष मंबई यांना आला. यावरुन वरीष्ठ विभागाकडुन जामखेड पोलीसांना कळवण्यात आले. तात्काळ जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात सह त्यांचे पथक नान्नज या ठीकाणी दाखल झाले.


सायंकाळी अहमदनगर येथील बॉम्ब शोधक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरकुळे हवालदार एस सी येटेकर पो. ना. सतिष पवार, उमेश मोरे दिनेश पाळलकर, अंकुश कुलांगे, गैरव भिंगारदिवे, देविदास शेंडे, रोहित कांबळे, अरुण गायकवाड, यांचे पथक नान्नज या ठीकाणी दाखल झाले.


या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी नान्नज या ठीकाणी घटनास्थळी पोहचुन परिसराची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी मेडिकल परीसरात जत्रेचे स्वरुप आले होते. मेडिकलसह संपूर्ण परीसराची या पथकाने तपासणी केली. डॉग स्कॉड मधिल जंजीर या श्वानाने संपुर्ण परिसर पिंजून काढला मात्र पथकाला बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तु आढळून आली नाही त्यामुळे ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या नंतर ज्या मोबाईल वरुन फोन आला त्या नंबरवर पोलिसांनी संपर्क साधला आसता तो फोन लागत नव्हता तसेच लागला तर सदर इसमाकडुन मी वेगवेगळ्या ठिकाणाहुन बोलत आहे आसे सांगितले जायचे. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सदर इसम हा सांगली जिल्ह्य़ातील एका गावातील आसल्याची माहिती समोर येत आसुन या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन चे कर्मचारी स. फौ शिवाजी भोस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दिनेश सुतार यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आसुन सध्या आरोपी फरार आहे.





