बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील जांबवाडी येथील अनेक दिवसांपासून बेपत्ता आसलेल्या तरुणाचा मृतदेह काल दि १४ सप्टेंबर रोजी शेतातील झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथील चौतीस वर्षीय युवक संतोष नामदेव सागडे, वय ३४ वर्षे, हा गुरुवार दि. ८ सप्टेंबर २०२२ पासुन बेपत्ता झाला झाला होता. या प्रकरणी मयत संतोष सागडे हरवला आसल्याची तक्रार देखील त्याच्या नातेवाईकांनी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. पोलिस त्या दृष्टीने संतोष याचा शोध घेत होते.

काल बुधवार दि १४ रोजी मयताचे नातेवाईक अशोक अप्पा तोडकर व त्यांचा मेव्हणा नवनाथ हे जुन्या जांबवाडी परीसरातील शेतात बैलं बांधण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील झुडपांच्या आत मध्ये संतोषचा मृतदेह लिंबाच्या झाडाला नायलॉन च्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. बरेच दिवस झाले असल्याने संतोष मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली .या नंतर जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात , विजय कोळी व भागवत पालवे, सचिन पिरगळ मेजर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई राजु थोरात सह पो.हे.कॉ संजय लाटे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here