कोरोनाचे दोन वर्ष लोटल्या नंतर कुठे नियमित शाळा सुरू झाल्या. त्यातच मागिल दोन वर्षात विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील कच्चा राहिला. आता त्यातच जामखेड तालुक्यात इयत्ता १ च्या विद्यार्थ्यांना शाळा उघडुन तीन महिने होत आले असले तरी पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने पाठ्यपुस्तकांचा सावळा गोंधळ सयोर आला आहे.
जामखेड तालुक्यात १७७ प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळेत सध्या २०६१ विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये १९०४ विद्यार्थींना पाठ्यपुस्तके मिळाली आहेत तर अद्यापही १५७ विद्यार्थी अजुनही पुस्तकांपासून वंचित आहेत .या मध्ये जामखेड शहरातील खाजगी मराठी शाळेमधे सर्वात कमी पुस्तके आली आहेत. पुस्तके कमी आल्याने पुस्तके वाटप कशी करायची आसा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. जामखेड तालुक्यातील इयत्ता १ ली च्या १५७ विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांनपैकी यातील तालुक्यातील ७५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके कमी आहेत दुसरीकडे शहरातील एकाच खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालीच नाहीत. त्यामुळे यामध्ये काही राजकारण तर होत नाहीना आसा प्रश्न पालकवर्गांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पक्का
पाया कुठुन सुरवात होत आसेल तर तो इयत्ता पहीली पासुन आणि त्यातच इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तकेच मिळत नसतील विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचे कसे होणार असा प्रश्न सध्या पालकांना सतावत आहे. अद्यापही तीन महिने होत आसलेतरी काही ठिकाणी पुस्तके मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुस्तके मिळावीत आशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
तालुक्यात १ ली ते ८ चे १२०४ विद्यार्थींना पुस्तकांपासुन वंचित
जामखेड तालुक्याची परीस्थिती पाहीली तर इयत्ता पहिली ते आठवीच्या एकुण २४४ एकुण शाळांची संख्या आहे. या मध्ये २४२३६ एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२२-२३ मध्ये सध्या २३०४६ एवढे पुस्तक संच आले आहेत .तर अद्यापही जामखेड तालुक्यातील इयत्ता १ ली ते ८ च्या १२०४ विद्यार्थी अद्यापही मोफत पाठय़पुस्तके मिळालेली नाहीत.