जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील महीलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मदत करु, त्या साठी महीलांना लागेल ती शासनाकडून मदत मिळवुन दिली जाईल उद्योग व्यावसाय घेऊन ३५ टक्के सबसिडी चा लाभ घ्या व महीलांनीही उद्योग व्यावसायाकडे वळावे आसे मत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी नान्नज येथिल महीलांच्या व्यावसाय प्रक्षिक्षण मेळाव्या दरम्यान केले.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व लक्ष्मीपुत्र फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव उद्योजक महिलांकरिता ६ दिवसांची RCT प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली.यामध्ये नवनवीन योजना तसेच महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्यात आले.

या वेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ग्रामसेवक युवराज ढेरे, विस्ताराधिकारी भोजनावळे ,ना.राम शिंदे यांच्या पत्नी व माजी सभापती जामखेड सौ.आशाताई राम शिंदे, लक्ष्मीपुत्र फाउंडेशन सचिव तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ. मंजुश्रीताई किशोर जोकारे, किशोर जोकारे, जामखेड भाजपा अध्यक्ष महिला आघाडी मनीषाताई अर्जुन मोहोळकर, उपसरपंच पांडुरंग उबाळे, चौंडी, जामखेड तालुका उपाध्यक्ष. अनिल हजारे,अजित पंडित, CRP सुरेखा कोळपकर, अजित कुलकर्णी, दर्शना साळवे, रुकसाना बोराटे ताई, नंदा सगळे, लक्ष्मी पिसाळ, स्वरूपा पंडित व सर्व गटातील महिला,
मा.सरपंच मा. सुनील हजारे, ग्रामपंचायत सरपंच नान्नज-संतोष मोहोळकर, जालिंदर खोटे सरपंच-चोभेवडी यांच्या सह आनेक मान्यवर उपस्थित होते.

यानंतर सौ आशाताई शिंदे म्हणाल्या की महीलांनी चुल व मुल या बरोबरच आरोग्य शिक्षण व महीला सक्षमीकरण करणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा सल्ला महीलांना दिला. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सर्व शासकीय योजनांची माहिती महीलांना दिली व मार्गदर्शन केले.

भाजपा ओबीसी महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. मंजुश्रीताई जोकारे यांनी योजनेचा सर्व महीलांनी फायदा घेण्यासाठी यावे व ट्रेनिंग पुर्ण करुन आर्थिक सक्षम व्हावे. याच बरोबर सेंट्रल बँकेचे मॅनेजर पाटील साहेब यांनी कर्जा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे अभार कीशोर जोकारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here