
जामखेड प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुसता जाहीर झाला असून या परीक्षेत जामखेड ची कन्या कु. स्नेहा नितीन सरडे हीने 720 पैकी 618 गुण मिळवून भारतातुन 13489 रॅक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले.

दिनांक 17 जुलै 2022 रोजी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी देशपातळीवर नीट परीक्षा एकाच दिवशी ऑफलाईन घेण्यात आली होती. या परीक्षेत 18 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कु. स्नेहा सरडे हीने कॅटेगिरी 5439 रॅक प्राप्त केला आहे. होतकरू मुलांचा आत्मविश्वास वाढवणारे यश असून मेहनतीने नीटची लढाई जिंकता येते हे तिने दाखवून दिले आहे. कु. स्नेहासरडे या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.घाटकोपर पोलिस ह.नितीन(दादा) सरडे रा.जामखेड यांची मुलगी आहे व आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष बजरंग सरडे यांची ती पुतणी आहे.







