जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले)

(रोखठोक न्यूज) जामखेड तालुक्यात इयत्ता १ ते ८ वी पर्यंत च्या एकुण १२०४ विद्यार्थींना पहीली घटक चाचणी जवळ आली तरी अद्याप शासनाकडून मोफत पाठय़पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. पुस्तके मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे पालकही चिंतेत आहेत.


नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा घाट घातला होता. त्यामुळे पालकांनी समाधान देखील व्यक्त करून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र शाळा सुरू होवून तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे .तर दुसरीकडे पहीली घटक चाचणी देखील जवळ आली आहे .तरीही तरी देखील जामखेड तालुक्यातील खाजगी मराठी शाळांसह विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. जामखेड तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या एकुण २४४ एकुण शाळांची संख्या आहे. या मध्ये २४२३६ एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२२-२३ मध्ये सध्या २३०४६ एवढे पुस्तक संच आले आहेत .तर अद्यापही जामखेड तालुक्यातील इयत्ता १ ली ते ८ च्या १२०४ विद्यार्थी अद्यापही मोफत पाठय़पुस्तके मिळालेली नाहीत. इयत्ता पहिली ची परीस्थिती पाहीली तर तालुक्यात २०६१ विद्यार्थी संख्या आहे यामध्ये १९०४ विद्यार्थींना पुस्तक संच मिळाले आहेत तर अद्यापही १५७ विद्यार्थी अजुनही पुस्तकांपासून वंचित आहेत .या मध्ये जामखेड शहरातील खाजगी मराठी शाळांमध्ये अद्याप पुस्तकेच मिळाली नाहीत .

दुकानातही मिळेनात पुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात मात्र ही पुस्तके अद्यापही शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता शिक्षण विभागाकडूनच पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. पालकांनी दुकानातून पुस्तके घ्यावीत असा सल्लाही देण्यात आला. मात्र दुकानांमध्येही पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ग्रामीण भागातील अनेक पालकांची परिस्थिती हलाकीची व गरीबीची आहे. ग्रामीण भागातील सर्व गरीब घरातील मुले जिल्हा परिषद प्रा.शाळेत शिक्षण घेत आहेत .या कुटुंबियांना चरितार्थ चालविण्यासाठीच नाकीनऊ येत आहे. तसेच पाठ्यपुस्तके विकत घेण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याची अवस्था फार दयनीय झाली आहे.

सध्या शाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. पहिली घटक चाचणी जवळ आली असली तरीही विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा पत्ताच नसल्याने परीक्षेत विद्यार्थी काय लिहणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे.

आ .रोहित पवार यांनी लक्ष घालावे पालकांची मागणी

आपल्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून आ. रोहित पवार यांनी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांत शैक्षणिकदृष्टय़ा मोठे काम केले आहे. त्यामुळे पालकांच्या तांच्याकडून मोठ्या अपेक्षा असताना प्राथमिक शाळेतील मुलेच पुस्तांपासून वंचित आहेत याचे पालकांना अश्चर्य वाटत आहे. या बाबत गांभीर्याने विचार करून आ. रोहित पवार यांनी यात तातडीने लक्ष घालून पुस्तके उपलब्ध करून द्यावेत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.

सर्व माध्यमांसाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत ची एकूण१२०४ संचांची मागणी राज्यस्तरावर नोंदविली आहे. आम्ही वेळोवेळी पुस्तकांची मागणी करत आहोत. या महिना अखेर पाठ्यपुस्तके प्राप्त होतील आशी माहिती जामखेड चे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here