जामखेड प्रतिनिधी
वाढत्या लपी आजाराचा धोका लक्षात घेऊन उद्या शनिवारी भरणारा जामखेडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद रहाणार आहे .या बाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव यांच्या ८ सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार लम्पी रोगाच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शनिवारी पासून आठवडे बाजार राहणार बंद राहणार असल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विस्तार पंचायत समितीचे डॉ संजय राठोड यांनी दिली .

जामखेड तालुक्यातील लंपी या जनावरांच्या आजाराची परीस्थिती पाहीली तर अद्यापही धोक्याच्या बाहेर आहे .या पुर्वी फक्त एकच जनावर तालुक्यातील मोहरी या ठीकाणी पाॅझिटिव्ह आढळून आले होते .सध्या या मध्ये वाढ झाली नसली तरी राज्यात लंपी अजाराची जनावरांची संख्या वाढली आहे . याच अनुषंगाने जामखेड सह संपूर्ण राज्यातील जनावरांचे अठवडी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव यांच्या ८ सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार देण्यात आले आहेत. यामध्ये गाय, बैल,म्हेस यांचा बाजार बंद परंतु शेळी मेंडी यांचा बाजार मात्र राहणार सुरू असे सांगितले आहे.
अत्तापर्यंन्त जामखेड तालुक्यात ११ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले आसुन आणखी ६ जनावरांचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आसुन त्यांचे रीपोर्ट येण्याचे बाकी आहे आशी माहिती माहिती पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय राठोड यांनी दिली आहे .
तेव्हा शासनास सहकार्य करावे आहे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक व सचिव यांनी केले आहे.












