जामखेड प्रतिनिधी

गणेश उत्सव व नवरात्री उत्सवा निमित्त गांधी एस एस कोचिंग क्लासेस जामखेड च्या वतीने विविध 12 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आसल्याची माहिती कोचिंग क्लास चे संचालक सागर गांधी यांनी दिली आहे.

गणेश उत्सव 2022 व नवरात्री उत्सव 2022 निमित्त रविवार दि ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता विविध स्पर्धांचे आयोजन गांधी एस एस कोचिंग क्लासेस जामखेड यांच्या वतीने क्लास मध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेत खुल्या बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मोदक डेकोरशन स्पर्धा होणार आहेत. १५ वर्षे वयोगटतील विद्यार्थ्यांसाठी कॅरम डबल्स स्पर्धा,  निबंध स्पर्धा, विज्ञान प्रकल्प, बुद्धिमत्ता स्पर्धा, सुडोकू स्पर्धा, रगभरण  स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मनोरंजक खेळ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा प्रवेश शुल्क माफक ठेवून एकूण आकर्षक 40 ट्रॉफीचे पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन गणेशोत्सवाचा व नवरात्री उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन आयोजक शिक्षिका सौ नीतू गांधी व प्रा. सागर गांधी यांनी केले आहे.  स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नाव नोंदणी  करण्याचा अंतिम दिनांक 10 सप्टेबरपर्यंत 2022 असेल याची सर्व पालक व स्पर्धक यांनी नोंद घ्यावी.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलांनी वेळेवर यावयाचे आहे. तसेच  स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतःचे प्रकल्प साहित्य  सोबत आणावयाचे आहे. सहभाग घेण्यासाठी प्रा सागर गांधी 9028026945 व शिक्षिका सौ नीतू गांधी 9579808111 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here