जामखेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली येथील मातंग समाजातील मूक बधीर मुलीवर बलात्कार करून तीचा खून केल्याच्या निषेधार्थ जामखेड येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र निषेध करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रासह देशात वारंवार मुली व महिलांनवर अन्याय अत्याचार च्या घटना सुरूच आहेत. त्यासाठी शासनाने कठोर पावले उचलून अशा नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेना जामखेड तालुक्याच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावातील एका मांतग समाजातील मूकबधिर मुलीवर बलात्कार करून अमानवी निर्घृण पणे तिचा खून करण्यात आला या प्रकरणी या घटनेत जो कोणी दोषी असेल त्या दोषी आरोपी वर लवकरात लवकर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनाचे जामखेड ता. अध्यक्ष पोपटराव फुले यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दि.९ डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावातील अनाथ मुकबधीर सुनिता कुडके वय २७ हया मुलीवर तिचा मुकबधीर व अनाथ असल्याने तिचा फायदा घेत तीच्या वर अत्याचार व बलात्कार करून तिचा खुन करण्यात आला या प्रकरणी सदरील घटनेचा राज्य सरकारने नामांकित वकीलाची नेमणूक करून सदरचा खटला जलतगतीने चालवून राज्य सरकारने पारित केलेला दिशा कायद्यानुसार त्या नराधामांना २१ दिवसात फाशी देण्यात यावी अन्यथा लहूजी शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी जामखेड तालुका लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. निवेदन देताना लहुजी शक्ती सेनाचे ता. अध्यक्ष पोपटराव फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर राळेभात, नगरसेवक अमीत जाधव, प्रा. विकी घायतडक, अनिल कांबळे, प्रदीप खवळे, नागेश फुले, विकास पडागळे, राजू साबळे, अशोक वाघमारे, दिपक सदाफुले, राजेंद्र सदाफुले, संदेश घायतडक, अशोक वाल्हेकर, भगवान आढाव , जयसिंग रिटे यांच्या सह समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.