जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री, खा शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्याकडून आरोळे हॉस्पिटलला ३.५ लाख रुपयांची औषध मदत करण्यात आली.

जामखेड तालुक्यातील आरोळे हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने तालुक्यातील व तालुक्याबाहेरील जनतेसाठी देवदूत ठरत आहे या हॉस्पिटल मधून आज पर्यंत उपचार घेऊन २४०० पेक्षा ज्यास्त रुग्ण घरी गेले आहेत. डॉ रविदादा आरोळे व डॉ शोभाताई आरोळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा बास्केटबॉल असो चे सचिव प्रा. सचिन गायवळ (सर) याच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदच पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोळे हॉस्पिटलमध्ये मध्ये आज साडेतीन लाख रुपयांचे औषधे व गोळ्या वाटप करण्यात आल्या.या वेळी बोलताना प्रा, सचिन गायवळ म्हणाले की ग्रामीन भागात डॉ, रवी दादा आरोळे व त्यांच्या भगिनी शोभाताई आरोळे यांनी जामखेड तालुक्यातील ज्या लोकांना कोरोना झाला आहे अशा लोकांची सेवा मोफत करून महाराष्ट्र राज्यात जामखेड कोरोना पॅटर्न म्हणून डॉ, आरोळे नावाचा ठसा निर्माण झाला असून आम्ही गायवळ बंधूनी या अगोदर लॉकडाऊन च्या काळात सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर मशीन, पिण्याचा पाणीपुरवठा, धान्य वाटप इ, वाटप करुन सामाजिक कामे त्यांनी केली आहेत. त्यांनी दिलेल्या अनेक मदतीने तालुक्यातुन गायवळ बंधूंचे कौतुक होत आहे, यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दत्ताभाऊ वारे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, सभापती सूर्यकांत नाना मोरे , स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष श्री.मंगेश दादा आजबे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय काका काशीद ,प्रहार तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, माजी सभापती सुभाष आव्हाड सर, नगरसेवक महेश दादा निमोणकर , प्रा लक्ष्मण ढेपे ॲडव्होकेट हर्षल डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व किशोर गायवळ, पत्रकार दत्तराज पवार, कल्याण सुरवसे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, युवक अध्यक्ष राहुल पवार, भोसले सर, कांतीलाल वाळुंजकर, गणेश म्हस्के, अमोल गिरमे, विजय धुमाळ सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here