अल्पवयीन मुलीस फुस लावून नेले पळवून

अज्ञात व्यक्ती विरोधात अपहणाचा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

इयत्ता दहावी मध्ये शिकत आसलेल्या आल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील धोंडपारगाव येथील इयत्ता दहावी मध्ये शिकत आसलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दि १४ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या रहात्या घरामधुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here