जामखेड प्रतिनिधी

श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह असतो.

आज रोजी साकत येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलीत श्री साकेश्वर गो शाळा साकत या ठिकाणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची पूजा करून साकत घाटातील मारूतीला प्रदिक्षणा घालणुन मोठ्या उत्साहात गो वंशांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुराजे, उपस्थित सर्व मान्यवर व सर्व धारकर्यांनी गोशाळेतील बैलांची पूजा करून, मंगल आष्टके म्हणून बैलाचे लग्न लावण्यात आले तसेच जामखेड तालुक्यातील सर्व नागरीक व भावीक भक्तांनी दिलेल्या पुरण पोळ्याचा नेवैद्य सर्व गो वंशांना खाऊ घालण्यात आला .

गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या आशीर्वाद ने गो माता जतन व संगोपनाचे महान कार्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याचे पांडुराजे भोसले व सर्व धारकरी अविरत पणे साकेश्वर गो शाळेमार्फत करत आहेत.

या गो शाळेत कत्तलीसाठी जाणारे जनावारे , गावात बे वारस असलेले जनावरे, अपघातात जखमी झालेले गो वंश या प्रकारचे गो वंशाचे संगोपन केले जाते याप्रसंगी शिवप्रतिष्ठान चे तालुका प्रमुख यांनी बोलताना सांगीतले की भारतीय देशी प्रजातीचे गो वंश जगले पाहीजेत टिकले पाहीजेत हाच प्रमाणीक उद्देश असल्याने हे पुण्य कार्य चालू आहे. गोवंश जगले पाहीजे हिंदुमध्ये जनजागृती नसल्याले हिंदु हे गोवंश कत्तल खान्यात विकुन पाप करत आहेत हे थांबले पाहीजे. गोवंश नष्ट होत असल्याने संकरित गाय यांचे प्रमाण वाढून त्यांच्या दुधापासून कॅन्सर सारखा महा भयानक रोग वाढत चाललेला आहे व त्यामुळे संपूर्ण मानव जात येते नुकसान होत आहे त्यामुळे प्रत्येक हिंदु बांधवांनी गो रक्षण केले पाहीजे व आपली हिंदु संस्कृती जपली पाहीजे.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर ,मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, जामखेड महिला दक्ष समितीचे सौ रोहणी संजय काशिद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याचे पांडुरंग भोसले व सर्व धारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here