जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील धोत्री या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून व फुस लावुन पळुन नेले. या प्रकरणी आरोपी अनिल हरीचंद्र काळभोर याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील धोत्री या ठीकाणी आरोपी अनिल हरीचंद्र काळभोर रा. धोत्री. ता. जामखेड याने याच गावातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावुन पळवुन नेले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकाने जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फीर्यादी वरुन वरील आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.