जामखेड प्रतिनिधी

येथील जामखेड नगर परिषदेच्या तर्फे दरवर्षी जमा निधीवरील पाच टक्के नीधी दिव्यांगानांना वाटला जातो. या साठी वेळोवेळी जामखेड तालुका प्रहार संघटनेने पाठ पुरावा केला असून सदर निधीचे वाटप नुकतेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यागणांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे तालुका अध्यक्ष जयसिंह उगले यांनी सांगितले.

सदर निधीचे वाटप नुकतेच जामखेड नगर परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले, यावेळी दिव्यागनासह प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंह उगले, शहर अध्यक्ष नयुमभाई, दिव्यागना सेल अध्यक्ष संदिप भुजबळ, स्नेहा शिंदे, शबनम सय्यद, यादव क्षिरसागर, विधाते मॅडम, संतोष झगडे आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांचा प्रहार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सदर वेळी जामखेड शहरातील ८५ लाभार्थीना ४ लाख ३० हजार निधीचे वाटप झाले असल्याचे प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष नय्युमभाई यांनी सांगितले.





