

शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याला पडले तडे; निकृष्ट कामाची चौकशी होणार का?
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. शहरातील विश्वक्रांती चौक चे बीड कॉर्नर याठिकाणी नविन तयार करण्यात आलेले सिमेंटच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या सिमेंटच्या रस्त्याला चक्क तडे गेले आहेत. त्यामुळे ठेकेदाराचा भोगंळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे जामखेड करांचा या रस्त्याचा वनवास मात्र अजुन संपलेला नाही असे दिसुन येत आहे. या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी याबाबत निषेध व्यक्त केला आहे. तसेच कामाची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी केली आहे.

जामखेड शहरातील विश्वक्रांती चौक ते बीड कॉर्नर पर्यंत सध्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र चालु असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. पुर्वी अठरा महीन्यात पुर्ण होणार्या रस्त्याला तीन वर्षे झाली तरी हा रस्ता अद्याप रखडलेलाच आहे. विषेश म्हणजे रस्ता पुर्ण व्हावा यासाठी अनेक पक्षांनी व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. तहसील कार्यालय याठिकाणी देखील अनेक बैठका घेण्यात आल्या मात्र अजुन देखील या राष्ट्रीय महामार्गच्या कामाला मुहूर्त लागला नव्हता.

मात्र आठ दिवसांपासून या कामास सुरुवात झाली मात्र घाई गडबडीत तयार करण्यात आलेल्या या सिमेंटच्या रस्त्याला चक्क तडे गेले आहेत. त्यामुळे ठेकेदाराचे हे पितळ उघडे पडले आहे. शहरातील रस्त्यांच्या विकासाच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी यामुळे उत्कृष्ट दर्जाचे काम होणार नाही हे उघड होत आहे. कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही शेवटी आता उडत असलेली धुळ ही तरी बरी होती अशी म्हणण्याची वेळ जामखेड करांनवर येणार आहे का? तर चालु असलेला रस्ता हा काही महिनाभरात खराब होऊन मग पुन्हा उडणारी धुळ ही सिमेंट खडीडस्टर याचा मात्र नागरिकांना त्रास होणारच आहे.

रस्त्यांच्या कामात लोखंडी गजाची बांधणी करण्यात आलेली नाही निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिट मिश्रण वापरल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत यामुळे काही दिवसांतच रस्ता पुर्णपणे खराब होणार आहे आणि भविष्यात भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे भेगा पडणार आहे. त्यामुळे या रस्त्याची पुर्ण चौकशी करुन निकृष्ट तयार करण्यात आलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी केली आहे. तसेच ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.








