८० कोटींच्या मलनिस्सारण गटर योजनेची चौकशी होणार; प्रशासनाचे लेखी आश्वासन

लेखी अश्वासनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे उपोषण स्थगित

जामखेड प्रतिनिधी

नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड गटर योजनेच्या कामात निकृष्ट व बोगस दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. सुमारे दहा तास चाललेल्या उपोषणानंतर संबंधित ठेकेदाराचे साईट इंजिनिअर व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उपोषण स्थगित करण्यात आले.

जामखेड नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड गटर योजनेच्या कामात निकृष्ट व बोगस दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शहाजी (काका) राळेभात, प्रशांत राळेभात तसेच नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पहाणी दरम्यान सदरचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आले होते. कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्याने संबंधित प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.

तातडीने सुधारणा न झाल्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला होता. अखेर मंगळवार दि १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी (काका) राळेभात यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले होते. सुमारे दहा तास चाललेल्या उपोषणानंतर संबंधित ठेकेदाराचे साईट इंजिनिअर व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी उपोषणकर्ते शहाजी राळेभात यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करताना म्हणाले की प्रशासनाने आम्हाला जे लेखी अश्वसासन दिले आहे त्या प्रमाणे त्यांनी संबंधित कामाची चौकशी करावी व पुढील काम चांगले व्हावे याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु असे सांगितले. पुढील १५ दिवसांत झालेल्या कामांची सखोल तपासणी करण्यात येईल. तपासणीत निकृष्ट साहित्य आढळल्यास ते तत्काळ हटवून दर्जेदार साहित्य वापरण्यात येईल. तसेच सुमारे ८० कोटींच्या मलनिस्सारण भूमिगत गटर योजनेची कामे नियमानुसार व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, तसेच कामाच्या दर्जा बाबत आपणास कोठे शंका येतील त्या ठिकाणी पहाणी करु व चांगल्या दर्जाचे काम संबंधित ठेकेदाराकडुन करुन घेतले जाईल असे अश्वासन मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिले. तसेच झालेल्या कामांची नागरिकांसमोर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आखेर तब्बल दहा तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) यांचे सुरु असलेले उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजी (काका) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंग गोलेकर, प्रशांत राळेभात, इस्माईल सय्यद, बिभिषण (मामा) धनवडे, वसीम सय्यद, संदीप राळेभात, कुंडल राळेभात, नगरसेवक माजिद कुरेशी, मंगेश (दादा) आजबे, सागर सदाफुले, रमेश (दादा) आजबे, अवधूत पवार, निखिल घायतडक, संजय डोके, वसीम शेख, नासिर चाचू सय्यद, अमोल गिरमे, अशोक घुमरे, जुबेर शेख, राजेंद्र गोरे, वैजिनाथ पोले, बिलाल शेख, आसिफ शेख, बजरंग डुचे, प्रविण माकुडे, अझहर खान, गणेश हगवणे, सचिन शिंदे, सागर भोसले, अनिल अडाले, दिपक घायतडक, गणेश आजबे, हरीभाऊ आजबे, बाळासाहेब खैरे, सलीम शेख, पै.सैफ शेख, दत्तात्रय डिसले, नय्यमभाई सुभेदार, मनोज कार्ले, तात्यासाहेब बांदल, इम्रान तांबोळी, सलिम तांबोळी सहआदी पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

गेल्या दोन महिन्यांपासून खर्डा चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात कटआउट्स लावण्यात आले आहेत. हे कटआउट्स नेमक्या कोणत्या नियमांनुसार व कोणाची परवानगी घेऊन लावले आहेत, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, नियम सर्वांसाठी समान असावेत जर विशिष्ट व्यक्तींना किंवा पक्षांना दीर्घकाळ कटआउट्स लावण्याची मुभा असेल, तर आम्हालाही एक-दोन वर्षे कटआउट्स लावण्याची परवानगी द्यावी. अन्यथा प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नियमांची अंमलबजावणी करावी.

(शहाजी राळेभात, राष्ट्रवादी युवा नेते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here