जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील आदर्श तलाठी श्रीराम कुलकर्णी यांना महसूल दिनी जिल्ह्यधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले व आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते आदर्श महसूल कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

१ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विठ्ठल बुलबुले, निवृत्त कर्नल आर व्ही धुमाळ आदी उपस्थित होते.

जामखेड येथील महसूल कर्मचारी श्रीराम कुलकर्णी जामखेड तहसील येथे २०१४ मध्ये रुजू झाले २०१९ मध्ये खर्डा येथे बदली त्यांनी आपल्या सजातील सातबारा संगणीकृत पासून ते सर्व आॅनलाइन कामे पूर्ण केलेली आहेत. तसेच कोरोना काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत काटेकोर उपाययोजनांची अमंलबजावणी केली यामुळे परिसरात कोरोना प्रादुर्भाव रोखता आला तसेच कोरोना लसिकरणाबाबत जनजागृती करत लोकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले.

शासकीय वसुली बाबत त्यांना दिलेले टार्गेट पुर्ण केले. १०० टक्के वसुली केली. तसेच सजातील वंचित निराधार, अल्पभूधारक, अपंग, परितक्तत्या, विधवा यांना संजय गांधी तसेच श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला दुर्बल घटकांना न्याय देत ११२ लोकांना लाभ मिळवून दिला. लोकाभिमुख कामाबाबत प्रसिद्ध असलेल्या कुलकर्णी यांच्या कामाची दखल घेत शासनाने महसूल दिनी त्यांना सन्मानित केले आहे.

त्यांच्या पुरस्काराबद्दल तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, खर्डा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य व नागरिक तसेच मंडलाधिकारी संतोष नवले, बाळासाहेब लटके , नंदकुमार गव्हाने, प्रशांत माने, कुटे मॅडम, तसेच सर्व तलाठी व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here