जामखेड प्रतिनिधी
शिऊर गण अनुसूचित जाती महीला राखीव आसल्याने नायगांव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी ससाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडुन उमेदवारी देण्याची मागणी वाढत आहे. तसेच सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकांच्या आडीआडचणी सोडवण्यासाठी धावणारे शिवाजी भिवाजी ससाणे यांच्या त्या पत्नी आहेत.
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे गट व गणवार आरक्षण काही दिवसांपुर्वीच जाहीर झाले. त्यामुळे जामखेड तालुक्यात इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने शिऊर गणात अनुसूचित जाती महीला आसे आरक्षण पडल्याने या गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडुन शिवाजी भिवाजी ससाणे यांच्या पत्नी व नायगाव च्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी ससाणे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
सुरेखा शिवाजी ससाणे या २०१५ ते २०२० आसे नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भुषविले आहे. पाच वर्षांच्या सरपंच काळात त्यांनी नायगाव ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वात जास्त घरकुल योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान अवास योजना व रमाई योजनेच्या माध्यमातून लोकांना जास्त घरांचा लाभ मिळवुन दिला आहे. यावेळी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना गैवरैवण्यात आले होते.
सरपंच काळ संपला आसला तरी लोकांच्या अडीअडचणीसाठी सोडवण्याचे काम माजी सरपंच सुरेखा शिवाजी ससाणे यांचे सुरुच आहे. सौ. सुनंदाताई पवार व आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून महीलांचा बचत गट तयार करून रोजगार मिळवून देण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. तसेच त्यांचे पती देखील राजकारणात त्यांच्या मदतीला आसतात. नायगाव परीसरात सर्व महापुरुषांच्या जयंती देखील सर्वसामान्य लोकांन सोबत घेऊन साजऱ्या केल्या जातात. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा देखील लाभ माजी सरपंच सुरेखा शिवाजी ससाणे यांनी लोकांना मिळवुन दिला आहे. माजी सरपंच यांचा जनते सोबत मोठा संपर्क आसल्याने व जनतेशी नाळ जोडली आसल्याने शिऊर गणातून राष्ट्रवादी काँग्रेस कडुन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.