जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील सचिन सुभाष खेत्रे यांची राज्यसेवा स्पर्धा परीक्षाद्वारे नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल नुकताच जामखेड येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

या निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी बी एस शिंदे, संतोष पवार, अशोक रणखांब, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात चाळीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.

यावेळी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन खेत्रे यांची सांगितले की, जिद्द, चिकाटी व मेहनत केल्यास यश हमखास मिळते. तसेच अपयश आले तरी खचून जाऊ नका. आत्मपरीक्षण करा. योग्य नियोजन करा यश हमखास मिळणारच असे सांगितले. सचिन खेत्रे यांनी घरची परिस्थिती गरिबीची असतानाही जिद्दने यश मिळविले आहे. त्यांचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण जामखेड येथेच झालेले आहे. पाचवी ते बारावी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आहे. तर डि.वाय.पाटील पुणे येथे यांत्रिक अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षा २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर. यात त्यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. या निवडीमुळे जामखेड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here