जामखेड प्रतिनिधी

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थींची आरोग्य तपासणी व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच खर्डा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. प्रा.शाळा व ऊर्दु शाळा खर्डा येथे दि २६ रोजी भारतीय जनता पार्टी खर्डा यांच्या वतीने विद्यार्थींची मोफत आरोग्य तपासणी व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवीदादा सुरवसे, मदन गोलेकर, वैजीनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, गणेश शिंदे, पप्पु दिंडोरे, राजु मोरे, राजु गोलेकर, डाॅ. सोपान गोपाळघरे, डाॅ बिपीनचंद्र लाड, डाॅ. दत्ता खोत, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे, बिबिषन चौघुले, टिल्लू पंजाबी, गोटु कांबळे, भिमराव गोपाळघरे, दादा चौधार, बापु होडशिळ, आण्णा खाडे, मच्छिंद्र गिते, योगेश सुरवसे, गहिनीनाथ खरात, बबलू सुरवसे, सुरज इंगळे, व खर्डा शाळा समिती सर्व शिक्षकवृद आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवीदादा सुरवसे यांनी सांगितले की गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज ओळखून व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पंकजाताई यांना दिर्घ आयुष्य लाभो व राजकीय क्षेत्रात उत्तरो उत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या. या नंतर वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे यांची होणाऱ्या मंत्रीमंडळात वर्णी लागावी आशी मागणी बाजीराव गोपाळघरे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here