जामखेड प्रतिनिधी
आषाढी निमित्त सध्या भाविक -भक्तांची पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना जवळके – सोनेगाव
येथील रसत्याला खड्डे आहेत. धाकटी पंढरी मानल्या जाणाऱ्या धनेगांव येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र या धाकटी पंढरीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे.
जवळके – सोनेगाव रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण ही वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
सध्या शाळेतील मुलांनाही ये – जा करता येत नाही .आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. पालखी मार्ग असल्याने वारकरी सांप्रदाय तसेच भाविक भक्तांना याच रस्त्याने जावे लागत आहे. या कडे लोकप्रतिनिंधीनी लक्ष घालून त्वरीत या रस्त्याचे काम सुरू व्हावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली.