जामखेड प्रतिनिधी
दहा वर्षात जो नीधी कर्जत जामखेड मतदारसंघात कोणी आणला नाही तो चारपट नीधी या आडीच वर्षांत आणला आहे. राज्यात सत्ता बदल झाला आसला तरी जनतेने चिंता करण्याचे कारण नाही. सत्ता गेली तरी विकास नीधी खेचुन आणणार यासाठी वेळ पडली तर मंत्र्याचे पाय धरेल मात्र कर्जत जामखेड चा विकास करुनच दाखवेल असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना आदेश पत्र वाटपाचा लाभार्थी मेळावा दिनांक ६ जुलै २०२२ दुपारी जामखेड येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी आ. रोहित पवार बोलत होते. या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, हनुमंत पाटील, विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, रमेश आजबे, जमीर सय्यद, दिगांबर चव्हाण, अमित जाधव, विश्वनाथ राऊत, उमर भाई कुरेशी, प्रशांत राळेभात, मोहन पवार, नरेंद्र जाधव , बापुसाहेब शिंदे, चंद्रकांत राळेभात, नान्नज चे संतोष पवार, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी कर्जत जामखेड मधुन जात आसलेल्या दिंडी व पालखी मधिल वारकर्यांची आरोग्य सेवा करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान केला.
पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की अडीच वर्षांत अनेक कामे हाती घेतली. सर्व सामान्य लोकांपर्यंत प्रत्येक योजना कशी पोहोचेल या साठी प्रयत्न केले. अडीच वर्षांत अत्तापर्यंन्त पाच हजार लोकांना डोल चालु केले. कर्जत जामखेड तालुक्यातुन जात आसलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटुन अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला याला खासदार डॉ.सुजय वीखे यांनी देखील पाठपुरावा केला होता. व्यक्तीगत लाभाच्या योजना पण लोकांनपर्यंत कशा पोहोचतील या कडे लक्ष दिले पाहिजे, मतदारसंघात निवडणूकी दरम्यान चॉकलेट वाटत होतो. विरोधकांनी नावे ठेवली पण माझी मुले समजुन मी त्या मुलांना चॉकलेट वाटत होतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पानंद रस्त्याचे काम हे कर्जत जामखेड मतदारसंघात केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२००३ अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. प्रत्येक गावातील मयत झालेल्या व कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या लोकांच्या याद्या बनवून त्यांची नावे कमी करण्याची मोहीम सुरुवातीला तहसील कार्यालयात सुरू झाली. त्यानंतर धान्य दुकानदार, पोलीस पाटील यांच्या मदतीने नवीन लाभार्थी निवड सुरू करण्यात आली त्यानंतर कर्जत तालुक्यातील १० हजार ४४८ व जामखेड तालुक्यातील ८ हजार ४२७ अशी एकूण १८ हजार ८७५ गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. दोन्ही तालुक्यात मिळून एकूण ८३ हजार ५७३ एवढ्या शिधापत्रिका उपलब्ध होत्या व त्याचे लाभार्थी एकुण सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक आहेत. त्यां नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.
चौकट
अधिकार्यांनो मी तुमच्या खंबीर पाठीशी
सत्ता गेल्याने घडी विस्कळीत करण्याचे काम विरोधक करणार आहेत मात्र विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल सामान्य माणसाबरोबर अधिकार्यांवर दबाव आणला तर मी अधिकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आसे अवहान देखील अधिकार्यांना आ. रोहित पवार यांनी केले आहे.