जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कडभनवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री साकेश्वर महाराजांचा ४२ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट चोरीला गेला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री साकेश्वर महाराजांचे प्रती मंदिर कडभनवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. मंदिरात देवाची मूर्ती व मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. सोमवार दि ४ रोजी सकाळी देवाचे भक्त फीर्यादी नामदेव शहादेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट स्वच्छ केला व नंतर कडभने हे घरी निघून गेले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावातील एक महीला मंदिरात आली आसता मुकुट चोरीला गेला आसल्याचे लक्षात आले. तेव्हा कडभनवाडी ग्रामस्थांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी फीर्यादी नामदेव शहादेव कडभने यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे हे करत आहेत.
चौकट
श्री साकेश्वर महाराज देवस्थानची सुमारे ५५ एकर बागायती जमीन कडभनवाडी येथे आहे. ग्रामस्थांनी वाडीत मंदिर बांधले आहे मंदिरात मुर्ती व मुर्तीवर चांदीचा मुकुट बसविलेला होता. तोच मुकुट चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवस्थान सारख्या पवित्र ठिकाणी चोर डल्ला मारू लागले आहेत यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.